आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Astitva Presents \'Kalpana Ek Aavishkaar Anek\' A Marathi One Act Play Competiton

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'कल्पना एक अविष्कार अनेक\'मध्ये मराठी कलाकारांमध्ये चुरस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अस्तित्व' आयोजित कै. श्री. 'मु. ब. यंदे पुरस्कृत' अठ्ठाविसाव्या 'कल्पना एक अविष्कार अनेक' या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत यावर्षी पुणे, मुंबई, कल्याण आणि नागपूर विभागातील एकांकिकामध्ये विजेतेपदासाठी चुरस होणार आहे. हे या स्पर्धेचे 28वे संयुक्त वर्ष आहे.
प्रसिध्द लेखक-कादंबरीकार राजन खान यांनी 'माणस...!' या कल्पनेवर आधारित पाच एकांकिकांची अंतिम फेरी येत्या शनिवारी 27 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात ठेवली आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी 21 सप्टेंबरला पार पडली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 20 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 18 एकांकिका सादर झाल्या. पहिल्या फेरीचे परिक्षक म्हणून डॉ. तुळशी बेहरे नीळकंठ कदम, प्रमोद लिमये आणि राजन पाटील हे मान्यवर होते.
लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणा-या स्पर्धेत महाविद्यालयीन तरुणांसोबतच, इतर क्षेत्रातील हौशी कलावंतही सहभागी होतात. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील ललित प्रभाकर, डोंबिवली फास्ट फेम संदेश जाधव, बॉम्बे टॉकिज फेम भाग्यश्री पाणे, मराठी रंगभूमीवरचे नवोदित कलाकार शीतल कुलकर्णी आणि संदीप रेडकर हे यावर्षीच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या स्पर्धकांपैकी आहेत.
मितीचार कल्याणची अरुण कोलटरांच्या कवितांवर आधारित, ललित प्रभाकर दिग्दर्शित 'सर्पसत्र', 'रंगभूमी' नागपूरच्या गौरव खोंडे लिखित-दिग्दर्शित, 'तिमिरात' संक्रमण पुणेची यतीन माझरे लिखित, 'उडान', सकस मुंबईची विशाल कदम लिखित, सुमित पवार दिग्दर्शित 'खेळ मांडियेला' आणि प्रवेश-मुंबईची भाग्यश्री पाणे लिखित संदेश जाधव दिग्दर्शित 'ब्लॅकआउट' या पाचही वेगवेगळ्या प्रकृतीच्या एकेकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत.