आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतुल कुलकर्णी-प्रिया बापटची 'हॅप्पी जर्नी', पाहा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी)
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट यांची 'हॅप्पी जर्नी' लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आम्ही बोलतोय ते अतुल आणि प्रियाच्या आगामी 'हॅप्पी जर्नी' या सिनेमाविषयी. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या `हॅप्पी जर्नी’ या आगामी सिनेमात अतुल आणि प्रियासह पल्लवी सुभाष मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सचिन कुंडलकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत तर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया हे निर्माते आहेत.
विशेष म्हणजे अतुल आणि प्रिया हे दोघे या सिनेमात बहीण-भावाची भूमिका साकारत आहेत. हे दोन कलाकार भावा-बहिणीच्या नात्यात दिसणार असले तरी हे नातं एका वेगळ्या पद्धतीने या सिनेमात सादर करण्यात आलं आहे. या भावा-बहिणीमध्ये भन्नाट केमिस्ट्री, पुरेपूर मजा आणि सुंदर इमोशन्स असणार आहेत. याआधी हिंदी आणि मराठी सिनेमांमधून समोर आलेल्या भावा बहिणीच्या नात्यापेक्षा `हॅप्पी जर्नी’ निश्चितच वेगळा आणि आजचा आहे, असा विश्वास निर्माता दिग्दर्शकांनी व्यक्त केला.
या सिनेमाचे चित्रीकरण पुणे येथील विविध ठिकाणी आणि गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात दोन सत्रांमध्ये झाले. प्रिया-अतुलच्या या आगळ्यावेगळ्या नात्यात नेमकं काय काय घडणार आहे, हे पाहण्यासाठ़ी सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हॅप्पी जर्नी' या सिनेमातील काही निवडक छायाचित्रे... ही छायाचित्रे फेसबुकवरुन साभार घेण्यात आली आहेत.