आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Fandry Film Producer Nagraj Manjule, Marathi Film

जगणे समजून घेण्याची कला अनुभवातून - नागराज मंजुळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तरुणाईला आणि प्रेक्षकांना भेटून चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच सर्वांशी संवाद साधण्यासाठी ते सोमनाथ अवघडे आणि सूरज पवारसह शहरात आले होते. मंजुळे म्हणाले, नववी -दहावीपासून कविता लिहीत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मी माझ्या मनातला कोलाहल बाहेर काढतो. व्यक्त होण्याचा हा माझा प्रयत्न होता. चित्रपटाविषयी ते म्हणाले, प्रत्येक कहाणीचा जीव असतो. 1 लिटर दुधात 10 माणसांचा चहा बनेल, त्यापेक्षा अधिक कराल तर पाणी घातले जाईल. ते मला नको होते. जे आहे ते जसे आहे तसे प्रेझेंट करायचे होते. पिस्तुल्या या लघुपटाच्या जोरावर एवढी मोठी उडी घेतली, ही बाब प्रेरणादायी आहे. सूरज पवार आणि सोमनाथ कसे भेटले, या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येकाला सलमानसारखे सिक्स पॅक असतील असे नाही, ते काही अलौकिक नाही. सौंदर्य व्यक्तिमत्त्वात असायला हवे. सूरज पिस्तुल्यापासून सोबत आहे. मित्राच्या शाळेमध्ये सूरज सापडला.

चित्रपटात काम करशील का, असे सूरजला विचारले. याबाबतची रंजक कथाही त्यांनी या वेळी सांगितली. महाराष्ट्राला नवा व्ही. शांताराम, अमोल पालेकर मिळाला असे म्हणता येईल का, याला उत्तर देताना ते म्हणाले, ही खूप मोठी माणसे आहेत. मी माझ्या पद्धतीने काम करत राहीन, नजरेला दिसेल तितकीच वाट पाहणार आहे. फार लांबचे पाहण्यावर माझा विश्वास नाही.

पुढे वाचा नागराज ऑस्कर पुरस्काराविषयी काय म्हणतात...