आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayushman Khurana, Arshad Warsi At Huma Qureshi Party

PICS: हुमा कुरैशीने दिली ईद पार्टी, अर्शद-आयुष्मानसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

[हुमाच्या ईद पार्टीत (डावीकडून) आयुष्मान खुराना आणि अर्शद वारसी पत्नी मारियासह]
मुंबई - 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या अभिनेत्री हुमा कुरैशीने सोमवारी दुहेरी सेलिब्रेशन केले. सोमवारी हुमाचा वाढदिवस होता. वाढदिवसासोबतच हुमाने ईदचेही सेलिब्रेशन केले. या निमित्ताने तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील अनेक सेलेब्स हुमाला वाढदिवसाच्या आणि ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते.
अभिनेता अर्शद वारसी पत्नी मारियासह पार्टीत सहभागी झाला होता. याशिवाय अभिनेता जॅकी भगनानी, डिझायनर ऋषिका लुल्ला, दिग्दर्शक सुधीर मिश्रा, मुश्ताक शेख, दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, दिग्दर्शक केन घोष, अभिनेता आयुष्मान खुराना, दिग्दर्शक अभिषेक कपूर हे सेलेब्ससुद्धा पार्टीत सहभागी झाले होते.
हुमाचा 'डेढ इश्किया' हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला होता. याशिवाय ती 'हायवे' या मराठी सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिचा वरुण धवनसोबतचा 'बदलापूर' हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हुमाच्या पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...