आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत बी-टाऊनच्या सुपरहिट \'मुजरा\' क्वीन,यांच्या अदा बघून चाहते होतात घायाळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: रेखा, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर
'मुजरा' बॉलिवूड सिनेमांतील एक महत्वपूर्ण भाग मानला जातो. परंतु प्रत्येक सिनेमात याची जोड असतेच असे नाही. मोजक्या सिनेमांमध्येच 'मुजरा' पाहायला मिळतो. रेखा, मधुबाला, वैजयंतीमाला यांचे मुजरे पाहून लोक घायाळ होत. मात्र आजच्या सिनेमांत दाखवले जाणा-या 'मुज-यां'मध्ये जरा रिमिक्स धूनचा तडका लागल्याने त्याचे स्परुप बदलले आहे.
माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, करीना कपूरसारख्या आजच्या अभिनेत्रींनी पूर्वीच्या सौंदर्यवतींचे अनुकरण करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. त्यात काहींचा प्रयत्न यशस्वी ठरला तर काहींचा फसला. 'इन आखो की मस्ती मे', 'दिल चीज क्या है' असे दमदार बोल असलेले मुजरे करणा-या रेखा यासाठी ओळखल्या जाऊ लागल्या. मधुबाला यांनी 'मुगल-ए-आजम'मध्ये केलेला 'प्यार किया तो डरना क्या' हा मुजरा आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
आज 'मुजरा'ची आठवण होण्याचे कारण म्हणजे, 'रमा-माधव' या मराठी सिनेमात आदिती राव हैदर या बॉलिवूड अभिनेत्रीने 'लूट लियो मोहे शाम सावरे बरबात जमुना किनारे' हा मुजरा सादर केला आहे. आदिती पहिल्यांदाच एखाद्या सिनेमात मुजरा करत आहे. एरवी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसणा-या या अभिनेत्री मुजरा करताना सोज्वळ रुपात दिसतात. त्यांच्या ख-या सौंदर्याची पारख या रुपातच करता येऊ शकते. अंगभर दागिने आणि कपडे परिधान करून आपल्या अंदानी त्या प्रेक्षकांवर जादूची छडी फिरवतात. मुजरा करताना त्यांच्या डोळ्यांचे हावभावच सर्वकाही सांगून जातात.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आज तुम्हाला रेखा, मधुबालापासून ते करीना, ऐश्वर्या रायपर्यंत... कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या सिनेमात कोणता मुजरा केला हे सांगणार आहोत....पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एरवी ग्लॅमरस दिसणा-या तुमच्या आवडत्या सौंदर्यवती मुज-यात कशा दिसतात.