आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu, Who Is The Horror Movie Hottie Of Bollywood Posted This Scary Picture Of Herself Looking Like A Zombie!

Halloween Day: हृतिकच्या मुलांनी घाबरवले, सनी बनली Sexy Bunny

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[सुझान रोशन मुले हृहान (रेड ब्लू चेक शर्ट) आणि हृदान (ब्लू ड्रेस)सोबत, शेजारी हृहान-हृदानचा मित्र]
मुंबईः हॅलोवीन डेच्या निमित्ताने बी टाऊनमधील अनेक सेलेब्स भयावह रुपात दिसले. दरवर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी बॉलिवूडमध्ये सनी लियोन, बिपाशा बसू, अमृता अरोरा, निमरत कौर या सेलिब्रिटींनी हा दिवस साजरा केला. इतकेच नाही तर हृतिकच्या मुलांनी आई सुझानसोबत हॅलोवीन डे एन्जॉय केला.
सनी लियोनः
सनी लियोन सध्या पटायामध्ये आगामी मस्तीजादे या सिनेमाचे शूटिंग करत आहे. शूटिंग सेटवर ती सेक्सी बनीच्या लूकमध्ये अवतरली. तिच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक मिलाप जावेरीसुद्धा दिसले.
सुझान आणि मुलेः
हृतिक रोशनपासून विभक्त झालेल्या सुझान रोशननेसुद्धा हॅलोवीन डे साजरा केला. यावेळी मुले हृहान आणि हृदान तिच्यासोबत दिसले. सर्वांनी भयावह मेकअप केला होता.
अमृता अरोराः
अभिनेत्री अमृता अरोराने पती शकील लडाकसोबत हॅलोवीन डे सेलिब्रेट केला. ती ब्रिटनी लूकमध्ये दिसली. अमृताने भडक लाल रंगाचे लिपस्टिक लावले होते. तर तिचे पती शकली दबंग चुलबुल पांडेच्या लूकमध्ये दिसले.
बिपाशा बसूः
अभिनेत्री बिपाशा बसूने आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक हॉरर सिनेमे केले आहेत. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हॅलोवीन डेच्या दिवशी तिचा मेकअप जास्त भयावह वाटत होता. ती यावेळी झोंबी लूकमध्ये दिसली.
निमरत कौरः
अभिनेत्री निमरत कौरनेसुद्धा हा दिवस साजरा केला. ती सध्या आपल्या आगामी होमलँड या सिनेमात बिझी आहे. ती यावेळी चेटकिणीच्या रुपात दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींची हॅलोवीन रुपातील छायाचित्रे..