आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या मानेवर तर मलायकाच्या कंबरेवर, पाहा सेलेब्सचे स्टायलिश टॅटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दीपिका पदुकोण)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका काल (5 जानेवारी) 29 वर्षांची झाली. दीपिका इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री झाली आहे, तिचा प्रत्येक सिनेमा यशस्वी होत आहे. 2013पासून तिने अद्याप एकही फ्लॉप सिनेमा दिला नाही. दीपिकाला तिच्या अभिनयासह स्टायलिश टॅटूसाठीसुध्दा ओळखले जाते.
दीपिकाने शरीरावर दोन टॅटू गोंदवून घेतले आहेत. एक गळ्यावर आणि एक पायावर आहे. दीपिका रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती, तेव्हा तिच्या गळ्यावरील टॅटू चर्चेत होते. कारण त्या टॅटूमध्ये आरके लिहिलेले होते. मात्र, आता ती रणवीर सिंहची गर्लफ्रेंड असल्याने तिने टॅटू बदलल्याचे बोलले जाते. दुसरे टॅटू पायावर असून ते पायातील चैनच्या आकाराचे आहे. सोबतच त्यामध्ये DP लिहिलेले आहे. याचा अर्थ दीपिका पदुकोण असा होतो.
टॅटू गायब झाल्याने आली होती चर्चेत-
दीपिकाच्या गळ्यावरील टॅटू मधल्या काळात दिसले नव्हते. त्यावेळी असे मानले गेले होते, की तिने टॅटू काढून टाकले आहे. परंतु तिचे गळ्यावरील टॅटू तसेच आहे. एका जाहिरातीदरम्यान मेकअप करताना हे टॅटू झाकण्यात आले होते. त्यामुळे अशा बातम्या समोर आल्या होत्या.
तसे पाहता, बॉलिवूडमध्ये टॅटूचा टॅटू लोकप्रिय आहे. दीपिकाशिवाय, अनेक सेलेब्सनी आपल्या शरीरावर विविध अवयवांवर टॅटू गोंदलेले आहेत. मात्र, काही सेलेब्स तात्पूरते टॅटूसुध्दा गोंदलेले आहेत, जे नंतर काढून टाकता येऊन शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टॅटूचे शौकीन असलेल्या काही बॉलिवूड सेलेब्सचे टॅटू...