आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baby Screening: Sonakshi, Taapsee, Esha Watch Movie

भावाचे लग्न आटपून 'बेबी'च्या स्क्रिनिंगला पोहोचली सोनाक्षी, हातावर दिसली मेंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः सोनाक्षी सिन्हा)
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'बेबी' हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होतोय. यानिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी बुधवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. अक्षयचा हा सिनेमा बघण्यासाठी अनेक बॉलिवूडकर आले होते. सिनेमाचे हे दुसरे स्क्रिनिंग होते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ब्लॅक गाउन आणि शॉर्ट डेनिम जॅकेटमध्ये दिसली. तिच्या हातावर मेंदी दिसत होती. अलीकडेच सोनाक्षीचा थोरला भाऊ कुश सिन्हाचे लग्न झाले. सोनाक्षीसोबतच तापसू पन्नी, ईशा गुप्ता, वाशू भगनानी, प्रज्ञा यादव, सलीम मर्चंट हे सेलेब्सही स्क्रिनिंगला हजर होते.
'बेबी' हा सिनेमा नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात अक्षय कुमारसोबत के. के. मेनन, अनुपम खेर, डॅनी डेंग्जोप्पा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...