• Home
  • Bollywood
  • Party
  • Amitabh, Aishwarya, Abhishek: Bachchan family comes together for Shamitabh screening Dailybhaskar.com

Screening Pix:बच्चन फॅमिलीने / Screening Pix:बच्चन फॅमिलीने बघितला 'शमिताभ', सास-यांचा अभिनय बघून भारावली ऐश्वर्या

Feb 06,2015 05:03:00 PM IST
(छायाचित्रेः बिग बींसोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित 'शमिताभ' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी म्हणजे गुरुवारी बिग बींनी कुटुंबीय आणि काही मित्रांसोबत सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.
सिनेमात हटके भूमिकेत असणारे बिग बी स्क्रिनिंगला पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्यासोबत पोहोचले होते. कुर्ता-पायजामा आणि गुलाबी रंगाच्या कोटमध्ये ज्युनिअर बच्चन डॅशिंग दिसत होता. तर 'जज्बा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी सज्ज असलेली अभिनेत्री ऐश्वर्या ब्लॅक आउटफिटमध्ये स्क्रिनिंगस्थळी दिसली. शमिताभ सिनेमा बघून ऐश्वर्या भारावलेली दिसली. तिने बिग बींना शुभेच्छा देत अलिंगन दिले.
या स्क्रिनिंगला बच्चन फॅमिलीसोबत अभिनेत्री हुमा कुरैशी, इरफान खान, गोल्डी बहल, डब्बू रत्नानी आणि मनिषा रत्नानी यांनी हजेरी लावली होती. बिग बींसोबत सिनेमात मेन लीडमध्ये असलेले धनुष आणि अक्षरा हसन मात्र स्क्रिनिंगला गैरहजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'शमिताभ'च्या स्क्रिनिंगला क्लिक झालेली खास छायाचित्रे...
चाहत्यांच्या गराड्यात अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन.बिग बींना अलिंगन देताना ऐश्वर्या.अभिनेता इरफान खान स्क्रिनिंगला पोहोचला होता.प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी पत्नीसोबत स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.अभिषेकसोबत ऐश्वर्या.अभिषेकचा 5 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता.अभिनेत्री हुमा कुरैशी हटके लूकमध्ये स्क्रिनिंगस्थळी दिसली.स्क्रिनिंगस्थळी जाताना अभिनेते अमिताभ बच्चन.अभिनेत्री जया बच्चन यांनीही स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.चाहत्यांना अभिवादन करताना ऐश्वर्या. तिच्यासोबत अभिषेक बच्चन.
X