आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KIFF: स्टेजवर समोरा-समोर आले जया आणि शाहरुख, पाहा फेस्टिव्हलचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिषक बच्चन, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ममता बॅनर्जी, मौसमी चटर्जी आणि शाहरुख खान)
मुंबई- 20व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हल (KIFF) सुरु झाले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताच्या नेताजी इंडोर स्टेडिअममध्ये सोमवारी (10 नोव्हेंबर) या फेस्टिव्हलचे उद्धाटन केले. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी बच्चन कुटुंबीयांसोबत शाहरुख खानसुध्दा उपस्थित होता.
अमिताभ आणि शाहरुखने ममता बॅनर्जीसोबत दीप प्रज्वलन करून फेस्टिव्हलच्या ओपनिंग सेरेमनीला सुरुवात केली. यावेळी स्टेजवर जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा उपस्थित होती. फेस्टिव्हल मध्ये इरफान खान, अभिनेत्री तनुजा, तनिषा मुखर्जी, मौसमी चॅटर्जीसह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या फेस्टिव्हलमध्ये 60च्या दशकातील 137 सिनेमांचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये 31 भारतीय सिनेमे सामील आहेत. या सिनेमांमध्ये 13 बंगाली सिनेमेसुध्दा आहेत. या फेस्टिव्हलचा समारोप 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शाहरुख आणि जया बच्चनने केली बातचीत
अलीकडेच, जया बच्चन यांनी शाहरुखच्या 'हॅपू न्यू इअर' सिनेमावावर वादग्रस्त टिका केली होती. त्यानंतर या प्रकराणाने शाहरुख आणि बच्चन कुटुंबात नाराजी वाढली होती. जया यांच्या या वक्तव्यानंतर अमिताभ यांनी शाहरुखची माफीदेखील मागितली. या फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला बच्चन कुटुंबीयांसोबत एकत्र पाहून वाटते, की त्यांच्यातील नाराजीचे सूर संपले आहेत. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चनसुध्दा सन्मान करण्यात आला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...