आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachchans, Sonakshi Sinha, Bipasha Basu, Malaika Arora Turn Traditional

स्वदेश इवेंटमध्ये दिसला बी टाऊनच्या स्टार्सचा ट्रेडिशनल लूक, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वदेश फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी रात्री मुंबईत एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी सहभागी झाली होती. बच्चन कुटुंबीयांपासून ते खान मंडळीपर्यंत सर्वच स्टार येथे दिसले. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे पार्टीत सहभागी झालेले जास्तीत जास्त स्टार्स पारंपरिक वेशात दिसले. इवेंटमध्ये अनेक स्टार्स आपल्या कुटुंबीयांसोबत दिसले.
अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन, अर्जुन रामपाल, संजय खान, सुझान रोशन, विद्या बालन, शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा, कुणाल कपूर, राहुल बोस, नेहा धुपिया, मलायका अरोरा खान, सोनाक्षी सिन्हा, सोफी चौधरी, लिएंडर पेस, करण जोहर, बिपाशा बसू या स्टार्सनी या पार्टीला आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले.
यावेळी सुझान अनारकलू लूकमध्ये दिसली. हातात बांगड्या आणि कपाळावर तिने मोठी टिकली लावली होती. सुझानचे वडील संजय खान आणि आई जरीनसुद्धा या पार्टीत दिसले. अर्जुन रामपाल पत्नी मेहेरसह पार्टीत सहभागी झाला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टार्सच्या ट्रेडिशनल लूकची खास छायाचित्रे...