आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: पात्र जिवंत करण्यासाठी टक्कल करण्यात मागे नाहीत हे कलाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरचा नवा लूक समोर आला होता. ‘हैदर’साठी त्याने टक्कल केले होते. हा लूक सैनिकांच्या हेअरकटसारखा आहे. बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड नवा नाही. यापूर्वीही अनेक सिनेतार्‍यांनी आपल्या पात्रानुसार हा प्रयोग केला आहे.
चित्रपटात एखाद्या पात्राच्या अनुरूप स्वत:ला तयार करणे सिनेतार्‍यांसाठी सोपे काम नसते. यासाठी त्यांना कायापालट करावा लागतो. त्यामध्ये सिक्स पॅक अॅब्सपासून ते टक्कल करण्यापर्यंतचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये असा कायापालट सामान्य बाब आहे. तसेच तेथील कलावंत भूमिकेच्या अनुरूप स्वत:ला तयार करतात. बॉलिवूडही आता मागे राहिलेले नाही. इंडो-चायनीज चित्रपट ‘डिझायर’मध्ये शिल्पा शेट्टीने टक्कल केले होते. कारण तिने यात बौद्ध भिक्षूची भूमिका साकारली होती. अमोल पालेकर यांच्या ‘अँड वन्स अगेन’मध्ये अंतरा माळीदेखील बौद्ध भिक्षू बनली होती. यासाठी तिनेसुद्धा टक्कल केले होते. अभिनेत्यांमध्ये शाहिदचे ताजे उदाहरण आहे.
यापूर्वी कोणकोणत्या कलाकारांनी आपले पात्र जिवंत करण्यासाठी टक्कल केले, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...