आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बँग बँग'च्या दुस-या ट्रेलरमध्ये दिसली हृतिकची धमाकेदार अ‍ॅक्शन, पाहा Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बँग बँग'च्या एका सीनमध्ये हृतिक रोशन)
मुंबई: हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या 'बँग बँग' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंद आणि फॉक्स स्टार स्टुडिओचा हा सिनेमा या आठवड्यात रिलीज होत आहे. त्यामुळे सिनेमाचे दोन्ही स्टारकास्ट जोमाने प्रमोशनला लागले आहेत. या ट्रेलरमध्ये अॅक्शन, रोमांच आणि हृतिक-कतरिनाशिवाय डॅनी आणि जाकिर हुसैनसुध्दा दिसत आहे.
सिनेमा रिलीजच्या एक आठवडापूर्वी 'बँग बँग'चा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 'बँग बँग'च्या दुसरा ट्रेलर पहिल्या ट्रेलरच्या तुलनेत डबल डोज आहे. विशेष म्हणजे, या ट्रेलरमध्ये संवादसुध्दा आहेत.
'बँग बँग' 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हा टॉम क्रूज आणि कॅमरॉन डियेज अभिनीत 'नाइट अँड डे' हॉलिवूड सिनेमाचा रिमेक आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक आणि कतरिनाची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइजवर सिनेमाचा ट्रेलर...