मुंबईः हृतिक रोशन स्टारर 'बँग बँग' या सिनेमाला
बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळाले आहे. 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला. या सिनेमात हृतिकसह
कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 27.54 कोटींचा गल्ला जमवाल आहे. तर 'बँग बँग'सोबत रिलीज झालेल्या शाहिद कपूर स्टारर 'हैदर'ला सिनेमाला पहिल्या दिवशी 6.14 कोटींच्या कमाईवरच समाधान मानावे लागले.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग' हा सिनेमा पाच हजारांहून अधिक स्क्रिनवर देशभरात रिलीज झाला आहे. हिंदीसह तामिळ आणि तेलगू भाषेत हा सिनेाम रिलीज करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या सुटीचा फायदा सिनेमा झाला आहे. देशभरातील थिएटरमध्ये सिनेमाला 75 टक्क्यांपेक्षा जास्त ओपनिंग मिळाले आहे. मॉर्निंग शोपासूनच सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. मल्टीप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रिनवर प्रेक्षकांची गर्दी जमली होती. 'बँग बँग' या सिनेमाला यावर्षी रिलीज झालेल्या
सलमान खान स्टारर '
किक' आणि
अजय देवगणच्या '
सिंघम रिटर्न्स'पेक्षा जास्त ओपनिंग मिळाले आहे.
'बँग बँग'ने मोडित काढला सलमानच्या 'किक'चा रेकॉर्ड...
'बँग बँग' या सिनेमाची हृतिक-कतरिनाचे चाहते आतुरतेने वाट पाहात होते. त्याचा परिणाम म्हणून सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जोरदार ओपनिंग मिळाले. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणा-या टॉप 5 सिनेमांमध्ये 'बँग बँग'चा समावेश झाला आहे. 'बँग बँग'ने पहिल्या दिवशी 27.54 कोटींची कमाई करुन सलमानच्या किकचा रेकॉर्ड मोडला. किकची पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या टॉप ओपनिंग मिळवणा-या बॉलिवूड सिनेमांविषयी आणि सोबत 'हैदर'ला मिळालेल्या कमी ओपनिंगविषयी...