('बँग बँग'च्या एका सीनमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफ)
मुंबई: हृतिक रोशनच्या 'बँग बँग'ने केवळ पाच दिवसांत 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या 'बँग बँग'ने सोमवारीपर्यंत (6 ऑक्टोबर) 107 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या कमाईसोबत बॉलिवूडमध्ये सर्वात वेगाने 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पाचवा सिनेमा ठरला आहे.
'बँग बँग' रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 100 कोटींच्या आकड्यापासून दूर होता. परंतु पाचव्या दिवशी सिनेमाने गतीने
बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला. 'बँग बँग' यावर्षीचा सातवा अशा सिनेमा आहे, जो 100 कोटींचा बिझनेस करण्यात यशस्वी झाला आहे. यापूर्वी '
किक', '
सिंघम रिटर्न्स', 'हॉलिडे', 'जय हो', 'एक विलेन' आणि '2 स्टेट्स' या सिनेमांनी 100 कोटी आणि त्यापेक्षा जास्त कमावले आहेत.
'बँग बँग'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस (BO)वर 27.54 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. दुस-या दिवशी सिनेमाने 24.08 कोटींची कमाई केली. तिस-या दिवशी 20.01 अर्थातच शनिवारी (4 ऑक्टोबर) आणि रविवारी 22.41 कोटींचा बिझनेस सिनेमाने केला. अशाप्रकारे सिनेमाने चार दिवसांत अर्थातच पहिल्या आठवड्यात 94.13 कोटींच्या घरात सामील झाला. दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 13 ते 14 कोटींची कमाई केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हृतिकच्या 'बँग बँग'ची कमाईशी निगडीत इतर फॅक्ट्स...