आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 कोटींची कमाई करूनदेखील सुरु आहे 'बँग बँग'ची घौडदौड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बँग बँग' चे पोस्टर)
मुंबई: हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत 'बँग बँग' सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजूनही कमाई करत आहे. दुस-या आठवड्यात सिनेमाने 20 कोटींची कमाई केली. भरतीय बॉक्स ऑफिसवर 'बँग बँग'ने 154.68 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.
सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित 'बँग बँग'ने दुस-या आठवड्यात चांगला बिझनेस केला. सिनेमाने शुक्रवारी 4.9 कोटी, शनिवार 6.3 कोटी आणि रविवारीसुध्दा 8.03 कोटींचा शानदार व्यवसाय केला. सिनेमाचा एकूण व्यवसाय पाहिला तर हा आकडा 290.97 कोटींच्या आसपास आहे.
दिर्घकाळाच्या वीकेंडवर रिलीज झालेल्या 'बगँ बँग'ने या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांना मागे टाकले आहे.
'बँग बँग'ने एकूणच चांगले प्रदर्शन केले असल्याचे या कमाईवरून समजते. एवढेच नव्हे, सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये 'ये जवानी है दीवानी' आणि 'एक था टायगर'च्या कमाईला मागे टाकले आहे. 'बँग बँग' केवळ 11 दिवसांत ओव्हरसीजमध्ये कमाईच्या बाबतीत 7व्या क्रमांकाचा सिनेमा बनला आहे.