मुंबईः अभिनेता हृतिक रोशनचा 'बँग बँग' हा सिनेमा
बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 50 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. गुरुवारी, 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. या सिनेमात हृतिकसोबत
कतरिना कैफ मेन लीडमध्ये आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 27.54 कोटींचा तर दुस-या दिवशी 24.08 कोटींचा व्यवसाय केला.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा देशभरात पाच हजारांहून अधिक स्क्रिनवर रिलीज झाला. एवढ्या स्क्रिन्सवर रिलीज झाल्याचा फायदा सिनेमाला झाला आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत तिकिटबारीवर 51.62 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'बँग बँग'ला या आठवड्यात आलेल्या सुटीचासुद्धा थेट फायदा झाला आहे. हिंदीसह तामिळ आणि तेलगूमध्येही सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. या विकेंडचे अद्याप दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे रविवारपर्यंत हा सिनेमा शंभर कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्यात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात
आहे.
'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'चा रेकॉर्ड मोडित काढण्याची शक्यता...
'बँग बँग' बॉक्स ऑफिसवर ज्याप्रमाणे मार्गक्रमण करत आहे, त्यानुसार हा सिनेमा दीडशे कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्यात यशस्वी होईल, असे म्हटले जात आहे. आता या सिनेमासमोर 'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचे रेकॉर्ड मोडित काढण्याचे आव्हान आहे. 'धूम 3' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमांनी पहिल्या आठवड्यात शंभर कोटींचा व्यवसाय केला होता. 'बँग बँग'ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 107 कोटींचा व्यवसाय केल्यास, हा एक नवीन रेकॉर्ड ठरेल.
पुढील स्लाईड्सवर वाचा, हृतिक कशाप्रकारे मोडित काढू शकतो खान्सचे रेकॉर्ड...