आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Quotes SRK’S ‘Senorita’ Dialogue Of ‘DDLJ’

ओबामा म्हणाले, \'सॅनोरिटा, बडे बडे देशों में...\'; भाषणातील उल्लेखाने शाहरुख आनंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा)

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी आपल्या भाषणामध्ये हिंदीतील गाजलेला डायलॉग सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली. निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी ओबामा यांनी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात संवाद साधला. अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ओबामा यांनी सर्वांना 'नमस्ते' केला.
'सॅनोरिटा, बडे बडे देशों में...' मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेलच, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. गेल्यावेळी भारत भेटीवर आलो, त्यावेळी इथल्या काही कार्यक्रमांमध्ये मी आणि मिशेल यांनी नाचण्याचाही आनंद घेतला होता, अशी आठवण सांगून ओबामा म्हणाले, यावेळी तशी संधी मिळाली नाही.
आपल्या सिनेमातील गाजलेल्या डायलॉगचा उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात करणे अभिमानास्पद असल्याचे ट्विट बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने केले आहे. शाहरुखने ट्विट केले, "राष्ट्रपती ओबामांच्या भाषणाचा भाग बनल्याने मी आनंदी आहे. ते भांगडा करु शकले नाही, याचे दुःख आहे. पुढील वेळी छैयां छैयां नक्की करुया."
पुढील स्लाईडमध्ये पाहा शाहरुखचे ट्विट...