आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B'day Spcl: Actor Randhir Kapoor Celebrates His 68th Birthday

68 वर्षांचे झाले रणधीर कपूर, करीनाच्या जन्मानंतर पत्नीपासून झाले विभक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 15 फेब्रुवारी 1947 रोजी प्रसिध्द अभिनेता राज कपूर यांच्या घरी जन्मलेले रणधार कपूर यांना सर्वच ओळखतात. त्यांना अभिनयाची कला आपल्या कुटुंबातूनच अवगत झाली. 'श्री 420' (1955) सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारणारे रणधीर कपूर यांनी इनेक सिनेमांत काम केले आणि काही सिनेमे निर्मितसुध्दा केले. रणधीर कपूर यांची प्रमुख्य सिनेमांमध्ये 'कल आज और कल', 'जवानी दिवानी', 'रामपूर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतीजा'सारखे सिनेमे सामील आहेत.
रणधीर कपूर यांनी 6 नोव्हेंबर 1971मध्ये प्रसिध्द अभिनेत्री बबीता यांच्यासोबत लग्न केले. दोघांना दोन मुली आहेत. करीना आणि करिश्मा कपूर दोघीही बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत.
रणधीर-बबीताने लग्न केले तेव्हा त्यांची लव्हस्टोरी एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी नव्हती. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु नशीबीला हे मान्यच नव्हते.
कपूर घराण्याची सून झाल्यानंतर बबीता यांनी सिनेमापासून दूरावा ठेवला आणि घरात आपले मन रमवले. परंतु रणधीर यांनी मद्यपान करण्याचे व्यसन लागली आणि करिअरकडे दूर्लक्ष करू लागले. बबीता यांना रणधीर यांचे असे वागणे अजिबात आवडले नाही. दोघांमध्ये दिवसेंदिवस मतभेद वाढू लागले आणि एक दिवस असा आला, की करीनाच्या जन्मानंतर दोघे विभक्त झाले. मात्र दोघांनी घटस्फोट घेतला नाही.
रणधीर कपूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...