आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B\'DAY SPCL: Actress Tina Ambani Turns 58 Today.

B\'DAY: 58 वर्षांचा झाल्या टीना, अंबानी घराण्याच्या आहेत दुस-या सूनबाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- टीना अंबानी)
मुंबई- देशातील प्रसिध्द उद्योग घराण्यातील सूनांपैकी एक टीना अंबानी यांची वेगळी ओळख देणे गरजेचे नाही. 1975मध्ये इंटरनॅशनल टीन प्रिन्सेस कॉन्टेस्टमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या टीना अंबानी 70-80च्या दशकात प्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक होत्या. अभिनेत्री आणि अनिल अंबानी यांची पत्नी टीना बुधवारी आपला 58वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 फेब्रुवारी 1957 रोजी गुजरातमध्ये जैन कुटुंबात जन्मलेल्या टीना मुनीम यांचे बालपण मुंबईतच गेले.
1978मध्ये 'देस-परदेस' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या टीना यांना देवानंद यांनी सिनेसृष्टीत आणले असे सांगितले जाते. देवानंद यांनी आपल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनेक नवोदित अभिनेत्रींना लाँच केले. त्यापैकी एक टीना यांना एख मानले जाते.
अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आपली नवी ओळख निर्माण कऱणा-या टीना यांनी 13 वर्षांच्या करिअरमध्ये 35पेक्षा जास्त सिनेमे केले. मात्र या सिनेमांमध्ये काही सिनेमे हिट तर फ्लॉप ठरले.
टीना सिनेमांसाठी कमी आणि अफेअर्समुळे जास्त चर्चेत राहिल्या. संजय दत्त आणि राजेश खन्नापासून ते अनिल अंबानी यांच्यासोबतच्या अफेअरने टीना नेहमी चर्चेचा विषय राहायच्या. टीना आणि राजेख खन्ना लिव्ह-इन-रिलेशनशिप राहत असल्याचे चर्चांच्या त्याकाळी उधाण आले होते.
1986मध्ये त्यांची भेट अनिल अंबानी यांच्याशी झाली. त्यावेळी टीना बॉलिवूडच्या आघाडी अभिनेत्री होत्या. त्यानंतर अनिल अंबानी आणि टीना वारंवार भेटत राहिले आणि त्यांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. 1991मध्ये दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर अनेक वर्षे त्यांना धीरुभाई अंबानी यांच्या घराण्यात सूनेचे स्थान मिळाले नाही. 2 फेब्रुवारी 1993 रोजी धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सून म्हणून स्वीकारले. टीना दोन मुलांची आई आहेत. सध्या लाइमलाइटपासून दूर टीना बिझनेस, चॅरिटी, कला यात कार्यरत आहेत.
टीना यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त पाहूया खासगी आयुष्यातील न पाहिलेले छायाचित्रे...