आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : 'पुढचं पाऊल'पूर्वी तीन मालिकांमध्ये झळकली आहे प्रेक्षकांची आवडती कल्याणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्याकाळचे साडे सात कधी वाजले की प्रेक्षकांना वेध लागतात ते 'पुढचं पाऊल' या मालिकेचे. या मालिकेत कल्याणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हळवी, सतत दुसर्‍यांना मदत करण्यसाठी धडपडणारी कल्याणी म्हणून माहित असलेली जुई गडकरी आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे.
8 जुलै 1988 रोजी मुंबईजवळील कर्जत येथे जुईचा जन्म झाला. जुईचे वडील केतन गडकरी लेखक, गीतकार असून एमटीएनएलमध्ये कामाला आहेत. तर आई नेत्रा गडकरीसुद्धा एमटीएनएलमध्ये नोकरी करते. राम गणेश गडकरी हे जुईचे पंजोबा आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत जुई लहानाची मोठी झाली. तिने मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर जाहिरात आणि पब्लिक रिलेशन या विषयात पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली. याशिवाय वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट कॉलेजमधून तिने एमबीए पूर्ण केले.
गायिका आणि नृत्यांगणासुद्धा आहे जुई...
जुई ट्रेंड हिंदुस्थानी क्लासिक सिंगर आहे. याशिवाय तिने कथ्थकचे दोन वर्षे रितसर प्रशिक्षण घेतले आहे.
अभिनयात करिअर करण्याचा विचार नव्हता...
जुईने एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहायक दिग्दर्शिका म्हणून कामाला सुरुवात केली होती. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा तिचा मुळीच विचार नव्हता. दिग्दर्शन क्षेत्रात तिची रुची वाढू लागली होती. आईच्या आग्रहाखातर तिने स्वतःचे पोर्टफोलिया करुन घेतले. दिवंगत फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी तिचे पोर्टफोलियो केले होते. गौतम राजाध्यक्ष यांचा आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे जुई सांगते.

'पुढचं पाऊल'पूर्वी तीन मालिकांमध्ये केले काम...
'पुढचं पाऊल' या मालिकेद्वारे जुई घराघरांत पोहोचली. कल्याणी या भूमिकेने तिला बरीच लोकप्रियता मिळवून दिली. मात्र पुढचं पाऊल या मालिकेपूर्वी जुई तीन मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. 'बाजीराव मस्तानी' या मालिकेत चंदाचे पात्र तिने साकारले होते. याशिवाय 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत सोनिया आणि 'तुझवीण सख्या रे' या मालिकेत लावण्याच्या भूमिकेतून जुई प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

आज जुईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि 24 छायाचित्रांमध्ये पाहा जुईचा वेगळा अंदाज...
(फोटो साभार - फेसबुक)