आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी खूपच बोल्ड होती मंदाकिनी, पाहा तिच्या भूरळ घालणा-या अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: मंदाकिनी
80 दशकात ग्लॅमरस हिरोइनच्या रुपात ओळख निर्माण करणारी मंदाकिनीत आता खूपच बदल झालेला दिसून येतो. 30 जुलै 1969 रोजी मेरठ येथे जन्मलेल्या मंदाकिनीने एका वादानंतर फिल्म इंडस्ट्रीपासून संन्यास घेऊन संसार सुरु केला. आरके बॅनर अंतर्गत 'राम तेरी गंगा मैली' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या मंदाकिनीने दिर्घकाळ बॉलिवूडमध्ये आपला जलवा कायम ठेवला. तिचे वडील जोसेफ हे ब्रिटीश नागरिक होते आणि आई मुस्लिम कुटुंबातील होती. तिच्या बालपणीचे नाव यास्मीन जोसेफ होते.
मंदाकिनीने वयाच्या 16व्या वर्षीच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. राज कपूर यांनी तिला 1985मध्ये 'राम तेरी गंगा मैली'मध्ये मुलगा राजीव कपूरसह काम करण्याची संधी दिली. मंदाकिनीने फिल्मी करिअरमध्ये अनेक सिनेमे केले त्यात सिम्हासनम (तेलगू सिनेमा), ओम, जीवा, आग और शोला, जाल, मजलूम, अपने अपने, लोहा ,प्यार करके देखो ,डान्स डान्स, हवालात, परम धरम, प्यार मोहब्बत, जीते है शान से, शूरवीर ,कमांडो, हम तो चले परदेश, मालामाल, तेजाब ,अग्नि, नाग नागिन, कहा है कानून, आखिरी बाजी ,जंग बाज ,ना इन्साफी ,हिसाब खून का ,देश के दुश्मन ,लडाई हे सिनेमे सामील आहेत.
मंदाकिनीला फिल्म इंडस्ट्रीमधून संन्यास घेण्यासाठी सिनेमे न मिळण्याचे सर्वात मोठे कारण ठरले. तिने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकूरसह 1996मध्ये लग्नगाठीत अडकली.
मंदाकिनीच्या बर्थ डेनिमित्त तिची काही ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील क्लिक करून पाहा किती बोल्ड होती 'राम तेरी गंगा मैली हो गई'ची हिरोईन...