आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीके’तील पाच सेकंदांच्या भूमिकेने बदलले त्या भिका-याचे आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा बहुप्रतीक्षित ‘पीके’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यात अवघ्या पाच सेकंदांची भूमिका सकारणा-या मनोज रॉयचे संपूर्ण आयुष्य आता बदलून गेले आहे. मनोजने चित्रपटात अंध भिका-याची भूमिका साकारली आहे. रस्त्यावर भीक मागणा-या मनोजला गावातील एका दुकानात नोकरी मिळाली आहे. एवढेच नव्हे, त्याचे आता ‘फेसबुक’वर अकाउंट असून एक गर्लफ्रेंडही मिळाली आहे.

काही महिन्यांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी दिल्लीत आलेल्या ३९ वर्षीय मनोजची अचानक लॉटरी लागली. जंतर मंतरवर भीक मागत असताना दोघांनी त्याला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. सोबत २० रुपयांची नोट आणि एक फोन नंबरही दिला होता. मनोजने या क्रमांकावर फोन केला. त्याला नेहरू स्टेडियमवर बोलावण्यात आले. मनोज दुस-या स्टेडियमवर पोहोचला. तेथे सात भिकारी आले होते. मनोजला त्याच्यासोबत उभे करण्यात आले. ऑडिशन झाली. निवड होईल की नाही, याचा विचार मनोजने कधीच केला नव्हता. मोफत जेवण मिळणार यातच समाधान होते. आठवड्यानंतर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

अशी आहे भूमिका
मनोज रॉय चित्रपटात रस्त्यावर भीक मागताना झळकला आहे. रस्त्याच्या कडेला उभा राहून तो आमिरखानची वाट पाहताना दाखवण्यात आले आहे. मनोजची भूमिका फक्त पाच सेकंदाची आहे.
पाच सेकंदांनी आयुष्य...
गावकरी मनोजला आता ‘पीके हनी सिंह’ या नावाने हाक मारतात. गावातील एका दुकानात त्याला नोकरी मिळाली. त्याला गर्लफ्रेंडही मिळाली आहे. भविष्यात बंगाली आणि आसामी सिनेमात काम करण्याची मनोजची इच्छा आहे.

गरिबीमुळे भिकारी
मनोज रॉय हा आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील बेदेती येथील रहिवासी. त्याचे वडील मजुरी करायचे. आईचा मृत्यू झाला. शिक्षण सोडून भीक मागण्याची वेळ आली. मनोजने दिल्ली गाठली. अंध असल्याचा देखावा करत तो भीक मागू लागला.