आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scenes Of Marathi Film Sau Shahshi Deodhar

रुपेरी पडद्यावर 'सौ. शशी देवधर' विषयी उत्सुकता, बघा BEHIND THE SCENES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोण असेल सौ. शशी देवधर? नुकत्याच दिसू लागलेल्या जाहिराती आणि प्रोमो पाहून चित्रपट जाणकारांसोबत सिनेरसिकांची उत्सुकताही कमालीची वाढलीय. 'सौ.शशी देवधर' असे शीर्षक असलेला हा सिनेमा नक्की कोणत्या विषयावर असणार आहे, याविषयीचे तर्क सध्या चित्रपट प्रेमीमध्ये लढविले जाताहेत. टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीच्या लूकमध्ये जाहिरातीत दिसणारी सई ताम्हणकर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. कौटुंबिक चित्रपटाला सस्पेन्सची जोड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी केली आहे. चित्रपट निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजीत यांना त्यांचे पती अपरेश रणजीत व ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स प्रा. लि.’चे कृष्णा शेट्टी, नीता शेट्टी यांनी महत्वाची साथ दिलीय.
रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीतून 'सौ.शशी देवधर' चित्रपट साकारलाय. मराठीत बऱ्याच दिवसानंतर अशा शैलीतला चित्रपट पाहायला मिळणार असून याचे कथा लेखन आणि दिग्दर्शन केलंय अमोल शेटगे यांनी. या सिनेमात अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शीकर, सई ताम्हणकर यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची पटकथा अमोल शेटगे आणि शर्वाणी- सुश्रुत यांची असून संवाद लिहिलेत कौस्तुभ सावरकर यांनी. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या यातील गीतांना ट्बी- परीक यांनी संगीत दिलंय. चित्रपटाची सहनिर्मिती सुरेश पै यांनी केलीय.
लवकरच या चित्रपटाचे कुतूहल शमणार आहे, कारण हा बहुचर्चित चित्रपट येत्या 21 फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होतोय.
या सिनेमाचे बिहाईंड द सीन्स आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सिनेमाचे बिहाईंड द सीन्स...