आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करसाठी पाठवला जाऊ शकतो \'जातीश्वर\', पाहा Trailer+Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जातीश्वर' सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी)
मुंबई: सृजित मुखर्जी यांच्या 'जातीश्वर' या बंगाली सिनेमाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येऊ शकते. या सिनेमाने आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. 'जातीश्वर' याचवर्षी रिलीज झालेला सिनेमा आहे. समीक्षकांसह सर्वांनीच सिनेमाची भरभरून प्रसंशा केली आहे.
सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जीने टि्वट करून सिनेमा ऑस्करमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. प्रोसेनजीत चॅटर्जीने टि्वट करून लिहिले, 'धन्यवाद आणि गर्व आहे, की 'जातीश्वर'च्या टीमला त्यांच्या कष्टाचे फळ मिळणार आहे. हा सिनेमा ऑस्करसाठी निवडण्यात येऊ शकतो.'
सिनेमा एका म्यूझिशिअनभोवती गुंफण्यात आला आहे. प्रोसेनजीत चॅटर्जीने सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 1967च्या 'अँटनी फिरंगी' या क्लासिकवर बेतलेला आहे. सिनेमात एका गुजराती तरुणाची कहानी दाखवण्यात आलेली आहे. प्रेयसीच्या आनंदासाठी तो बंगालीमध्ये गाणे लिहण्याची इच्छा उराशी बाळगतो. त्यासाठी तो बंगाली संगीताचे धडे घ्यायला लागतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाहा सिनेमामधून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे आणि ट्रेलर...