आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या \'हॅप्पी न्यू इअर\'ची थीम आहे चोरी, Robberyवर तयार झाले आहेत हे सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खानचा 'हॅप्पी न्यू इअर' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सिनेमा डायमंडची चोरी आणि डान्सवर आधारित असल्याचे स्पष्ट दिसते. सिनेमाचा पूर्ण सस्पेन्स रिलीजनंतरच कळेल. या ट्रेलरला यू-ट्यूबर 6 दिवसांत जवळपास 5 लाख लोकांनी पाहिले आहे.
हॅप्पी न्यू इअर:
ट्रेलरमध्ये 'ये कहानी दुनिया की सबसे बडी चोरी की है' शाहरुखचा हा डायलॉग ऐकू येतो. सोबतच, ट्रेलरमध्ये किंग खानची अ‍ॅक्शनदेखील पाहण्यासारखी आहे. ट्रेलरचा दुसरा डायलॉग 'दुनिया मे दोन तरह के लोग होते है विनर्स अँड लूजर्स, लेकीन जिंदगी लूजर्स को एक मौका जरूर देती है जिसमे वो विनर बन सकता है' हा डायलॉग ऐकायला मिळतो. शाहरुख यावेळी चोरीची संकल्पना आपल्या सिनेमातून मांडणार आहे.
सिनेमा 6 लूजर्सच्या कहानीवर आधारित आहे. एका डान्स स्पर्धेत ते हि-यांची चोरी करण्याची योजना करतात. चोरीच्या या मिशनला 'हॅप्पी न्यू इअर'चे नाव देण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये चोरीच्या संकल्पनेवर आधारित अनेक सिनेमे आतापर्यंत तयार झाले आहेत. त्यामध्ये बँक रॉबरी, डायमंड रॉबरी, गोल्ड रॉबरी सारख्या चो-या सामील आहेत. या सिनेमांपैकी 'धूम' सर्वाधिक यशस्वी सिनेमा मानला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या चोरीच्या संकल्पनेवर तयार झालेल्या बॉलिवूड सिनेमांविषयी...