आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रानच्या भट्ट कॅम्पविरोधी नाराजीनाट्यावर अखेर पडदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज इम्रान हाश्मीची बॉलीवूडमधील ओळख केवळ भट्ट कॅम्पमुळेच असल्याचे सर्वश्रूत आहे. मावसभाऊ अन्वर हाश्मीचा मुलगा इम्रानच्या करिअरला महेश भट्ट यांनीच दिशा देण्याचे काम केले. बॅड बॉय हीरो आणि सीरियल किसरनंतर आज त्याने आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये प्रवेश केला आहे. इम्रानने ऑस्कर विजेता दानिश तानोविच्या ‘टायगर्स’मध्ये काम केले असून याचा प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवामध्ये पार पडला.
‘शांघाई’मध्ये त्याला प्रशंसेबरोबरच टीकेचादेखील सामना करावा लागला. बाहेरील बॅनरच्या सिनेमा निर्मितीदरम्यानही महेश भट्ट यांनी इम्रानला पाठिंबा देण्याचे काम केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील संबंध खराब झाले होते. सिनेमाच्या मानधनावरून त्यांच्यात मतभेद होते.
भट्ट कॅम्प कलावंतांना बाजारातून कमी किमतीत साइन करतो. इम्रानसाठीदेखील हाच नियम लागू करण्यात येत होता. महेश भट‌्ट विशेष फिल्म्समध्ये स्क्रिप्ट, दिग्दर्शन आणि इतर रचनात्मक बाबी पाहतात. तर मुकेश भट‌्ट बजेट, प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि मानधनाचा हिशेब ठेवतात. गेल्या महिन्यात इम्रानने भट‌्ट कॅम्पच्या ‘मिस्टर एक्स’ची डेट‌्स विचारताच ‘राजा नटवरलाल’च्या प्रमोशनमध्ये जोडली. इम्रानने परस्पर घेतलेल्या निर्णयावर महेश भट‌्ट चिडले आणि रागात ट‌्विट केले की, ‘इम्रान असे करू शकत नाही.’ यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला.
या सर्व घटनेनंतर आता इम्रान पुन्हा आपल्या भट्ट कॅम्पमध्ये परतला आहे. महेश भट्टसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनीदेखील इम्रानला माफ केले आहे. आता त्याने नव्या जोमाने भट‌्ट कॅम्पसोबत तीन सिनेमांचा करार केला आहे. या वेळी इम्रानच्या मानधनामध्येदेखील भरगच्च वाढ झाली आहे. यातील पहिल्या सिनेमाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे.
महेश भट्ट आणि इम्रान हाश्मीने टि्वटरवर एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. हे नाराजीनाट्य आता संपले असून इम्रानने भट्ट कॅम्पसोबत तीन सिनेमा साइन केले आहेत.