आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतनाथ रिटर्न्‍स : महानायकाची अग्निपरीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भूतनाथ रिटर्न्‍स' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा प्रिंट आणि प्रचारासहित एकूण खर्च हा 25 कोटी झाला आहे. चित्रपटाची निर्मिती बी.आर. फिल्म्स आणि टी सिरीजने मिळून केली आहे. मागील 7 दशकांपासून बी.आर. फिल्म्स दमदार कथेसाठी ओळखला जातो आणि टी सिरीजला मधुर आणि हिट संगीताची चांगली जाण आहे.
कोणत्याही चित्रपटाचे यश हे कथा आणि संगीतावर आधारित असते. निर्मात्यांच्या जोडीने चित्रपट स्वत: वितरित करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. अमिताभ बच्चन यांचे मागील एक दशकापासूनचे सोलो हीरो असणारे खूप कमी चित्रपट यशस्वी झाले आहेत. त्यामुळे 'भूतनाथ रिटर्न्‍स' चित्रपटाचे यश या शतकातील महानायकासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'मैं तेरा हीरो' चित्रपटाचा पहिल्या दिवशी 6 कोटींचा, तर वीकेंडचा व्यवसाय 21 कोटी इतका झाला. मनोरंजक मसाला असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांमधील एका वर्गाने भरभरून साथ दिली. या चित्रपटाचा आठवड्याचा व्यवसाय 35 कोटींपर्यंत गेला आणि हिट चित्रपटाच्या र्शेणीत या चित्रपटाने स्थान मिळवले. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काही समीक्षकांनी चित्रपटाचा अपप्रचार केला. मात्र, याचा काडीमात्र परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर दिसून आला नाही. शुक्रवारी आणि रविवारी भारताचा उपांत्य आणि अंतिम क्रिकेट सामना होता त्यामुळे सुरुवातीच्या तीन दिवसांचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा कमी झाला.