आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात केवळ ‘भूतनाथ रिटर्न्स’ची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाचा उन्हाळा बच्चेकंपनीसाठी मनोरंजनाच्या दृष्टीने दुर्मिळच ठरणार आहे. केवळ ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा चित्रपट या उन्हाळी सुटीमध्ये लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी येत्या 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनचे भूत व बालकलाकार पार्थ हा प्रोमोजमधून लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हा चित्रपट वगळता यंदा हॉलीवूडचेही चित्रपट लहान मुलांच्या विषयांवर आधारित नाहीत. सुटीमध्ये इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने ‘भूतनाथ रिटर्न्स’ला हिटसाठी चांगली संधी आहे. दिवाळी, नाताळ, रमजान ईदचे निमित्त साधून अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉक्स आॅफिसवर गल्ला गोळा करण्यासाठी अशा सुट्यांचा बॉलिवूड नेहमीच फायदा करून घेत असते. मात्र, लहान मुलांना मिळणार्‍या सुट्यांचा यंदा बॉलीवूडने विचार केल्याचा दिसत नाही. ‘भूतनाथ रिटर्न्स’चे प्रमोशनल गीत यो यो हनी सिंगने गायले आहे. विशेष म्हणजे अमिताभनेदेखील या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. हनी सिंगने
अमिताभ यांच्यासोबत गायलेले पहिलेच गाणे आहे. याशिवाय रणबीर कपूरशाहरुख खानही एका गाण्यामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहेत.
गिरीष कुलकर्णीचा ‘सलाम’
बॉलीवूड लहान मुलांच्याबाबत थंडावले असतानाच मराठीत मात्र काहीसे समाधानकारक वातावरण आहे. ‘फॅँन्ड्री’, ‘टाइमपास’नंतर नुकताच आलेला ‘यलो’ हा सध्या लहानांबरोबरच थोरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. याशिवाय गिरीष कुलकर्णी अभिनीत ‘सलाम’ हादेखील लहान मुलाभोवती केंद्रित कथानक असलेला चित्रपट या सुट्यांत प्रदर्शित होत आहे.
मोठ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न
‘भूतनाथ रिटर्न्स’च्या प्रोमोजमध्ये सध्या लहान मुलांबरोबरच मोठे कलाकारही दाखवले जात आहेत. मराठी अभिनेत्री उषा जाधव एका जाहिरातीनंतर अमिताभ बच्च्न यांच्याबरोबर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा दिसणार आहे. तसेच बोमन इराणी, अनुराग कश्यप आदी कलाकारांबरोबरचीही दृश्ये प्रोमोजमध्ये दाखवली जात आहेत. एकूणच हा चित्रपट लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.