आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भूतनाथ रिटर्न्स’ची बॉक्स ऑफिसवर धूम, पाहा सक्सेस पार्टीचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन, बोनम इराणी, उषा जाधव आणि पार्थ भालेराव स्टारर 'भूतनाथ रिटर्न्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गाजतोय. सिनेमाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी बुधवारी (16 एप्रिल) सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सक्सेस पार्टीत अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
कोण-कोण पोहोचले पार्टीत?
अमिताभ बच्चन, बोमन इरानी, पार्थ भालेराव, उषा जाधव, भूषण कुमार, कृष्ण कुमार, जी. पी. सिप्पी, उषा नाडकर्णी, पूनम ढिल्लन, नितेश तिवारी, रेणु रवि चोप्रा, अभय चोप्रा, कपिल चोप्रा यांच्यासह अनेक सेलेब्सनी भूतनाथ रिटर्न्सच्या सक्सेस पार्टीत उपस्थिती लावली.
पार्टीत अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे आपल्या खास अंदाजात दिसले. तर बालकलाकार पार्थही स्टायलिश लूकमध्ये येथे पोहोचला होता.
'भूतनाथ रिटर्न्स' 2008मध्ये रिलीज झालेल्या 'भूतनाथ' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'भूतनाथ'मध्ये शाहरुख खान सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. तर भूतनाथ रिटर्न्समध्ये शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. याशिवाय रणबीर कपूरही कॅमिओ रोलमध्ये सिनेमात दिसला. हा सिनेमा नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केला होता. तर भूषण कुमार आणि कृष्ण कुमार या सिनेमाचे निर्माते आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'भूतनाथ रिटर्न्स'च्या सक्सेस पार्टीची खास छायाचित्रे...