अभिनेत्री
प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 10 जून 2013 रोजी डॉ. अशोक चोप्रा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र 10 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. अशोक चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते.
शाहरुख खान,
परिणीती चोप्रा, उदय चोप्रा, दीपिका पदुकोण, शहाना गोस्वामी, करण जोहर, रणवीर सिंग,
रणबीर कपूरसह अनेक कलाकारांनी डॉ. चोप्रा यांचे अंत्यदर्शन घेतले होते. वडिलांच्या निधनामुळे प्रियांका खूप खचून गेली होती.
वडिलांच्या खूप जवळ होती प्रियांका
पिग्गी चॉप्स या नावाने प्रसिद्ध असलेली प्रियांका आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. तिने आपल्या
ट्विटर अकाऊंटवर स्वतःला 'डॅडीज गर्ल' म्हणून संबोधले होते.
अनेक अवॉर्ड सोहळ्यात वडिलांची असायची हजेरी...
प्रियांकाचे वडील तिच्यासह अनेक ठिकाणी सोबत दिसायचे. अवॉर्ड सोहळ्यात ते हमखास तिच्यासोबत असायचे. कॅनडात पार पडलेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात प्रियांकाला बर्फी सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी प्रियांकाने आपल्या वडिलांना मंचावर बोलावले होते आणि त्यांनीच तिला मिळालेला पुरस्कार स्वीकारला होता.
मुंबईतील एका रस्त्याला प्रियांकाच्या वडिलांचे नाव...
मुंबईतील यारी रोड (अंधेरी) प्रियांकाच्या घराजवळ आहे. या रस्त्याला डॉ. अशोक चोप्रा यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली होती. या मार्गाचे उद्धाटन उद्धव ठाकरे करणार असल्याचे म्हटले जाते.