आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या डान्स स्टेपवर आहे या \'मराठमोळ्या गोविंदा\'च्या नृत्याची छाप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नृत्यशैलीचे अनेक चाहते आहेत. मात्र स्वतः अमिताभ बच्चन यांना मात्र एका मराठी कलाकाराकडून डान्सची प्रेरणा मिळाली होती, हे फार लोकांना ठाऊक नाही. पन्नासच्या दशकात अमिताभ बच्चन यांना भगवान दादा यांच्याकडून ही प्रेरणा मिळाली होती.
दहीहंडीचा उत्सव असला की सकाळीच टीव्हीवर या उत्सवाशी संबंधित गाण्यांची गर्दी होते. या गाण्यांमध्ये सर्वात आधी लागले ते, भगवान दादा यांचे ब्लॅक अँड व्हाइट, गोविंदा आला रे...हे गाणे. दहीहंडीच्या गाण्यांचे हे आद्यगीतच आहे, असे म्हणायलाही हरकत नाही. या गाण्यात सगळ्यांनाच लक्षात राहतो तो भगवान दादा यांचा वेगळ्या लकबीतील डान्स. अशाच प्रकारचा डान्स अमिताभ बच्चन त्यांच्या बहुतांश गाण्यात करताना दिसले आहेत. बच्चन यांनीही काही मुलाखतींमध्ये आपल्याला भगवान दादांकडून अशा नृत्याची प्रेरणा मिळाली होती हे मान्य केले आहे.
अलबेला हा भगवान दादा यांचा प्रचंड गाजलेला चित्रपट. या चित्रपटात शोला जो भडके, भोली सूरत दिल के खोटे अशी गाजलेली गाणी आहेत. या गाण्यांमध्ये भगवान दादा यांच्या नृत्याची झलक पहायला मिळते, बिग बींनीही हा चित्रपट खास या नृत्यासाठी अनेकवेळा पाहिला होता, असे मुलाखतींमध्ये सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा भगवान दादांच्या कारकिर्दीविषयी...