प्रिती-नेस यांचा वाद हा बॉलिवूडकरांना एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीये. बॉलिवूड सेलेब्स या प्रकरणांत मौन राखणंच पसंत करत आहेत.
शाहरुख खान आणि
सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील यावर मौन बाळगणे योग्य समजले आहे.
सोनी टीव्हीच्या 'युद्ध' या शोच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये जेव्हा बिग बींना प्रिती झिंटाशी संबंधित प्रकरणावर विचारल्यावर ते म्हणाले, "मला वाटतं की हे प्रकरण आधीच कोर्टात आहे आणि मी यावर बोलणं योग्य नाही."
बिग बी आणि प्रिती यांनी 'कभी अलविदा ना कहना' आणि 'वीर झारा' या सिनेमांत एकत्र काम केलं आहे.
प्रिती-नेस यांच्या वादाकडे इंडस्ट्रीचा रोख बघून वाटतं की सगळे या प्रकरणांपासून दूर राहणेच पसंत करत आहेत. यावर कमेंटतर दूरच, बरेचसे बॉलिवूड कलाकार आपलं नावदेखील प्रिट-नेसशी संबंधित रिपोर्ट्समध्येदेखील येऊ देत नाहीत. प्रितीच्या जवळचे लोकही या प्रकरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, याचेही आश्चर्य वाटत आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा नेस-प्रिती यांच्या वादावर बॉलिवूडकरांनी केलेल्या कमेंट्स... यामध्ये प्रितीच्या होम प्रोडक्शन सिनेमा 'इश्क इन पॅरिस'चा दिग्दर्शक प्रेम राजपण सामिल आहे, तर तनुजा चंद्रा ते मुन मुन सेन यांचीही नावे आहेत.