आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Big Boss News In Marathi, Divya Marathi.com, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी डॉट कॉमवर ‘बिग बॉस’चे विशेष कव्हरेज, साइड स्टोरींसह प्रत्येक भागाचे विश्लेषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाचे दैनिक divyamarathi.com वर विशेष कव्हरेज करण्यात येणार आहे. यात साइड स्टोरीज, छायाचित्रांसह प्रत्येक भागाच्या नंतर त्याचे विश्लेषणही केले जाणार आहे. ‘बिग बॉस’च्या सहाव्या पर्वात प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले इमाम सिद्दिकी आठव्या पर्वात आमचे सेलबि्रिटी एक्स्पर्ट असतील. ते प्रत्येक भागाचे विश्लेषणही करणार आहेत.
‘घरामध्ये काय काय झाले?’ इथपासून ‘कोण कितपत पाण्यात आहे’ इथवर शोमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक हालचालींचे इमाम वेगळ्या अंगाने विश्लेषण करतील. त्यामुळे प्रेक्षकांना हा खेळ समजण्यास मदत होईल. इमाम अभिनेता, फॅशन डिझायनर तसेच कास्टिंग डायरेक्टरदेखील आहेत. विद्या बालन, अमिषा पटेल, अमर उपाध्याय, सोनाली कुलकर्णी, ल्यूक केनी, रुबी भाटिया, रागेश्वरी लुम्बा, ऋषिता भट्ट, मल्लिका शेरावत आदी कलाकारांचे कास्टिंग दिग्दर्शन त्यांनी केले आहे. इमाम माक्री यांच्या लिस्टमध्ये ‘जगात कोण काय आहे?’मध्ये एक ग्लोबल अचिव्हमेंट आयकॉनच्या रूपात सहभागी आहेत. ‘बिग बॉस - ८’शी संबंधित बातम्यांसाठी क्लिक करा divyamarathi.com.