आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्समध्ये अवतरलं मराठी तारांगण, बघा खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईत बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी तारांगण अवतरले होतं. यावेळी टेलिव्हिजन, थिएटर आणि संगीत क्षेत्रातील दिग्ग्जांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

अशोक सराफ यांना सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महेश मांजेरकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शक, ‘दुनियादारी’ उत्कृष्ट चित्रपट तर सचिन खेडेकरला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

या सोहळ्यात अभिजीत केळकर आणि प्रार्थना बेहरे यांनी अशोक सराफ यांच्या लोकप्रिय गीतांचा एक कार्यक्रम सादर करुन मानवंदना दिली. तर मानसी नाईक, क्रांती रेडकर, उमेश कामत, ईशा कोप्पीकर यांनी धमाल सादरीकरण दिले. याशिवाय हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव आणि सुप्रिया पाठारे यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

स्पृहा जोशी आणि निलेश साबळे यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. येत्या 13 ऑक्टोबरला संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम ईटीव्ही वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा बिग मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्सची खास झलक...