(इव्हेंटमध्ये पोहोचलेली बिपाशा बसु)
मुंबई- बिपाशा बसुचा 'अलोन' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मंगळवारी (9 डिसेंबर) मुंबईमध्ये झालेल्या ट्रेलर लाँचिग इव्हेंटमध्ये करण सिंह ग्रोवरसुध्दा बिपाशासोबत दिसला. बिपाशा आणि करण या सिनेमाच मुख्य भूमिकेत आहेत.
बिपाशा यावेळी प्रिन्टेड Turquoise & Gold मॅक्सीमध्ये दिसली. तिने हातात बांगड्या घातलेल्या होत्या. तसेच, करण सिंह ग्रोवर सूटमध्ये दिसला. इव्हेंटमध्ये सिनेमाचा दिग्दर्शक भूषण पटेलसुध्दा सामील झाला होता. सिनेमाचे कास्ट अँड क्रू मेंबर्ससुध्दा लाँचिंग इव्हेंटमध्ये सामील झाले होते. 'अलोन' 16 जानेवारी 2015 रोजी रिलीज होणार आहे.
इव्हेंटमध्ये बिपाशाने हॉरर सिनेमामध्ये काम करण्यासोबतच इतर अनेक गोष्टीही शेअर केल्या...
1. मला 'हॉरर क्वीन' म्हणून संबोधले जाते याचा मला काहीच फरक पडत नाही. मला आनंद होतो, की माझे सिनेमे लोकांचे मनोरंजन करतात. इंडस्ट्रीला असेच हवे आहेत. म्हणून मी हॉरर क्वीन या नावाने समाधानी आहे.
2. मी सिनेमात एका रंजक भूमिकेत दिसणार आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे. त्यामध्ये लव्ह सीन्ससुध्दा पाहायला मिळणार आहेत. हा माझा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि भयावह सिनेमा आहे.
3. मी जेव्हा रिलेशनशिपबद्दल कटीबध्द असते, हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे यावर न बोलेलचं बरं.
4. जेव्हा भूषण पटेल यांना विचारले, की सनी लिओन आणि बिपाशा या दोघींत सेक्सी कोण आहे? यावर बिपाशाने मध्येच उत्तर देत सांगितले, 'मी डार्क (सावळा) आणि ती फेअर (गोरी) आहे.'
5. अशाप्रकारच्या सिनेमांसाठी
सलमान खान,
अक्षय कुमारसारख्या अभिनेत्यांविषयी बोलायचे झाले तर, प्रेक्षकांना त्यांना अशा भूमिकेत बघायचे असेल तर त्यांनी हॉरर भूमिका स्वीकाराव्यात. तेसुध्दा अशा भूमिका करू शकतात. मला हॉरर सिनेमांमधून ओळख मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉरर सिनेमा 'अलोन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...