(करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसु)
मुंबई- बिपाशा बसुचा 'अलोन' या आगामी सिनेमात टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवरसुध्दा मु्ख्य भूमिकत आहे. सिनेमाच्या यशासाठी दोघांनी एका इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. स्टारडस्ट अवॉर्ड्सदरम्यान दोघे सोबत दिसले.
अवॉर्ड्स फंक्शनमध्ये बिपाशा-करण ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. बिप्सने ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. तसेच, करण ब्लॅक सूट आणि व्हाइट शर्टमध्ये दिसला. इव्हेंटदरम्यान दोघांनी सोबत विविध पोजसुध्दा दिल्या. करण सिंह ग्रोवर अलीकडेच, पत्नी जेनेफर विंगेटपासून विभक्त झाला आहे. बिपाशा आणि हरमन यांच्यामध्येसुध्दा सर्वकाही ठिक नाहीये.
बिपाशा-करण यांच्या अफेअरच्या चर्चा-
इंडस्ट्रीमध्ये बिपाशा आणि करण यांचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. 'अलोन'च्या ट्रेलर लाँचिंगवेळी करणला जेव्हा विचारण्यात आले, की बिपाशासोबत बोल्ड सीन्स देण्याचा अनुभव कसा होता? यावर तो म्हणाला, 'बिपाशासोबत रोमान्स करणे खूपच चांगला अनुभव होता.' दोघांनी
आपली मैत्री स्वीकर केली आहे. मात्र दोघांच्या नात्याविषयी अनेकांना शंका आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टारडस्ट अवॉर्ड्समधील दोघांनी छायाचित्रे...