आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Bipasha Basu And Karan Singh Grover New Year Party Together

PHOTOS: बिपाशाने करणसोबत सेलिब्रेट केले न्यू इयर, गोव्यात केली जंगी पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर मित्रांसोबत)
मुंबईः बिपाशा बसूने गोव्यात न्यू इयर पार्टी सेलिब्रेट केली. या पार्टीत तिच्यासोबत करण सिंह ग्रोवर दिसतोय. दोघे मागील काही दिवसांपासून अनेक इव्हेंटमध्ये एकत्र सहभागी होत आहेत.
बिपाशा आणि करण न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्यात पोहोचले होते. येथे त्यांचे आणखी काही मित्रही हजर होते.
पार्टीत सर्वांनी भरपूर धमालमस्ती केली. इंडस्ट्रीत बिपाशा आणि करणच्या रिलेशनशिपवर बरीच चर्चा रंगतेय. अलीकडेच करण पत्नी जेनिफरपासून विभक्त झाला आहे. तर बिपाशा आणि हरमन बावेजा यांच्यातही दुरावा निर्माण झाला आहे.
'अलोन'मध्ये एकत्र झळकणार बिपाशा-करण
'अलोन' या आगामी सिनेमात करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसू एकत्र झळकणार आहेत. या हॉरर सिनेमाद्वारे करण बी टाऊनमध्ये डेब्यू करतोय. या महिन्यात 16 तारखेला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय. भूषण पटेल यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिपाशा-करणची न्यू इयर पार्टीतील खास छायाचित्रे..