आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu And Karan Singh Grover Spotted At Bandra

PICS: बॉयफ्रेंड हरमनपासून विभक्त होऊन करणसोबत फिरतेय बिपाशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसु)
मुंबई- बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर यांना काल रात्री (6 जानेवारी) मुंबईच्या वांद्रामध्ये स्पॉट करण्यात आले. दोघे वांद्र्यामधील बिपाशाच्या घराजवळ दिसले. त्यांच्यासोबत रॉकीसुध्दा दिसला.
यावेळी बिपाशा आपल्या मोबाईलमध्ये बिझी दिसली. ती कारच्या मागल्या सीटवर बसलेला होता आणि करण पुढच्या सीटवर होता. फोटोग्राफर्सना पाहून दोघांनी हसून पोज दिल्या. बिपाशा आणि करण 'अलोन' सिनेमात सोबत काम करताना दिसणार आहे. करण या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. मागील काही दिवसांपासून दोघे सिनेमाच्या प्रमोशननिमित्त सोबत फिरताना दिसत आहेत. मात्र, काल (6 जानेवारी) दोघे कोणत्या इव्हेंट सामील होण्यासाठी गेले नव्हते.
बिपाशाने अलीकडेच, हरमन बावेजासोबतच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. करणसोबत तिचे अफेअर असल्याच्या चर्चासुध्दा समोर येत आहेत. करणसुध्दा पत्नी अभिनेत्री जेनिफरपासून विभक्त झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा-करण यांना स्पॉट करण्यात आलेली छायाचित्रे...