(फोटो- 'अलोन'च्या सीनमध्ये बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर)
मुंबई- बिपाशा बसुचा 'अलोन' आज पडद्यावर झळकला आहे. सिनेमात तिच्या अपोझिट करन सिंह ग्रोवरसुध्दा दिसला, त्याला हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. 'अलोन' एक हॉरर सिनेमा असून बिपाशा दुहेरी भूमिकेत आहे.
बॉलिवूडमध्ये हॉरर क्वीन नावाने प्रसिध्द बिपाशाला या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत. तिच्या मते, हा तिच्या करिअरचा सर्वांत चांगला हॉरर सिनेमा आहे. सिनेमाच्या ट्रेलरला यू-ट्यूबर 66 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. याचा अंदाज घेता, असे म्हटले जाऊ शकते, की बिपाशाचा हा सिनेमा यशस्वी ठरू शकतो. सिनेमाचे दिग्दर्शन भूषण पटेलने केले आहे.
भितीदायक होता सिनेमाचा ट्रेलर-
'अलोन'मध्ये दोन सयामी जुळ्या बहिणींची कहाणी आहे. मात्र, दोघींना वेगळे करताना शस्त्रक्रियेदरम्यान दोघींपैकी एक बहीण मृत पावते. मृत्यूनंतर ती
आपल्या बहिणीचा पाठलाग करते. या दोन्ही बहिणींची नावे संजना आणि अंजना आहे. ट्रेलरमध्ये भयावह सीन्स जूने आणि संकल्पना नवी आहे.
पडद्यावर बिपाशा-करणची जोडी-
सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच बिपाशी आणि करण यांच्या जोडीने चर्चा एकवटली. बिपाशा बॉयफ्रेंड हरमन बावेजा आणि करण पत्नी जेनेफर विंगेटपासून विभक्त झाला. सिनेमादरम्यान दोघांची जवळीक वाढली अशा बातम्या माध्यमांध्ये नेहमी येत राहिल्या. दोघांनी सिनेमाच्या प्रमोशन आणि नवीन वर्षेसुध्दा एकत्रच साजरे केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा-करणची लव्ह केमिस्ट्री...