आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: बालपणी अशी दिसायची बिपाशा, पाहा मॉडेलिंग काळातील निवडक Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: बिपाशा बसू)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आज वयाची 36 वर्षे पूर्ण करत आहे. 7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001मध्ये 'अजनबी' या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2002 मध्ये रिलीज झालेला 'राज' हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर 2005 मध्ये आलेला नो एन्ट्री हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ 55 सिनेमांमध्ये अभिनय केला. अलोन आणि द लव्हर्स हे तिचे आगामी सिनेमे असून यावर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.
अभिनेत्रीसोबतच बिपाशा एक यशस्वी मॉडेलसुद्धा आहे. बातम्यांनुसार, बिपाशाचे मॉडेलिंग क्षेत्रातील पदार्पणाचे श्रेय अभिनेता अर्जुन कपूरची पत्नी आणि माजी सुपरमॉडेल मेहर जेसियाला जाते. कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये बिपाशा आणि मेहरची भेट झाली होती. तेव्हा मेहरनेच बिपाशाला मॉडेलिंग क्षेत्राचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. मेहरच्या सल्ल्यानुसार बिपाशा या क्षेत्राकडे वळली आणि यश प्राप्त केले.
आज बिपाशाची गणना सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. मात्र बालपणी ती सावळी आणि बरीच लठ्ठ होती. प्रेमाने लोक तिला लेडी गुंडा म्हणायचे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिपाशाची बालपणी आणि मॉडेलिंगच्या काळातील निवडक छायाचित्रे...