आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महबूब स्टुडिओमध्ये मी आणि डिनो पाच रुपयांची थाळी शेअर करत होतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: बिपाशा बसु)
करिअरची सुरुवात बिपाशा बसुने 'राज' या हॉरर सिनेमामधून केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट होते. या दोघांची जोडी 12 वर्षांनी पुन्हा एकदा एका हॉरर सिनेमासह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. परंतु 'राज' सिनेमानंतर या जॉनरमध्ये बिपाशा बसुला यश मिळाले नव्हते. तिचा मागील 'आत्मा' हा हॉरर सिनेमासुध्दा फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आता ती या जॉनरचा 'अलोन' करत आहे, त्याचे शूटिंग सुरु झाले आहे. 'रागिनी एमएमएस 2'चा दिग्दर्शक भूषण पटेल हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. 'क्रिएचर 3D' सिनेमानिमित्त बिपाशासोबत काही बातचीत झाली. त्याचे काही अंश तुमच्यासमोर मांडत आहोत...
प्रश्न: तुझी आणि विक्रम भट्टची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे, किती प्रेशर आहे?
उत्तर- विक्रमसह काम करण्याचे वैशिष्टेच असे आहे, की काहीच प्रेशर नसते. तो एक दूरदृष्टी व्यक्ती आहे. त्याला तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आहे त्यामुळे सिनेमा रंजक असल्याचा विश्वास आहे. लोक हॉलिवूड सिनेमांचे हिंदी डब सायन्स-फिक्शन पाहण्यास प्रधान्य देतात. त्यामुळे त्यांना 'क्रिएचर' पसंत पडेल असे वाटते.
प्रश्न- फिटनेसव्यतिरिक्त तुला खाण्यापिण्याची आवड आहे का?
उत्तर- मी खाण्याची शौकीन आहे. पण कधी-कधी खाण्याचा कंटाळादेखील येतो. रोज एकाचप्रकारचे जेवण दिले तरी मला काही फरक पडत नाही. कारण मी मॉडेलिंगला सुरुवात केली होती, तेव्हा एकटी राहत होते. तेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसेदेखील नव्हते, कारण माझे सर्व पैसे इंटरनॅशनल एजेन्सीकडे होते. एक वर्ष खूप हालाखीत गेले. पाच रुपयांची नूडल्स प्लेट खात होते. महबूब स्टुडिओमध्ये पाच रुपयांना एक थाळी मिळायची. मी आणि डिनो मारिया ती थाळी शेअर करत होतो. कधी-कधी पैसे नसायचे तेव्हा केवळ फळे खाऊन दिवस काढले.
बिपाशाने तिच्या आयुष्यातील कोण-कोणत्या गोष्टी शेअर केल्या त्या जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...