आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशा बसूचा 'सिंग्युलॅरिटी' हिंदीतही प्रदर्शित होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबर 2010 मध्ये शूटिंगला सुरुवात झालेल्या बिपाशा बसूच्या 'सिंग्युलॅरिटी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनेक अडचणी आल्या आहेत. या ब्रिटिश चित्रपटात बिपाशा बसू आणि अभय देओल यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या कालखंडातील आहे. बिपाशाने चित्रपटात मराठी वीरांगणा तुळजा नाईकची भूमिका साकारली असून चित्रपटातील प्रमुख पात्र तिच्या प्रेमात पडते. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला चित्रपटाचे शीर्षक 'सिंग्युलॅरिटी' होते. आता बदलून 'द लव्हर्स' करण्यात आले. हा चित्रपट भारतात हिंदीत प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येत आहे.