आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हमशकल्स'च्या प्रमोशनमधून गायब असलेल्या बिपाशाने सोडलं मौन, जाणून घ्या ती काय म्हणाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला आगामी सिनेमा 'हमशकल्स'च्या प्रसिद्धी कार्यक्रमांना अनुपस्थित बिपाशा बासूविषयी अनेक अफवा उठल्या आहेत. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट सिनेमाची प्रसिद्धी करण्यात व्यस्त आहे, परंतू बिपाशाच्या अनुपस्थितीने सगळ्यांना चकीत करुन सोडले आहे. 'बिपाशा लवकरच टीम जॉइन करेल' असं सांगून सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खान याने बिपाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू ही गोष्ट लोकांना पटत नाहीये.
या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी बिपाशाने ट्विटरचा आधार घेतला आहे. तिने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, "मी फॉक्स स्टार स्टुडिओला शुभेच्छा देते. त्यांच्यासोबत मी माझा सगळ्यात हिट सिनेमा 'राज-3' केला. 'हमशकल्स'चे निर्माते वाशूजींनादेखील मी शुभेच्छा देते. ते एक चांगले निर्माते आहेत. मी माझे को-स्टार्स सैफ, रितेश, तमन्ना, ईशा आणि सगळ्या तंत्रज्ञांनादेखील शुभेच्छा देते. कधी कधी काही प्रवास अपुर्ण राहतात आणि हा (हमशकल्सचा) त्यातलाच एक आहे. मी कोणावर आरोप करणार नाही, परंतू काही गोष्टींच्या असहयोगामुळे माझा प्रवास अर्धवट राहिला." बिपाशाच्या या ट्विटनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तिच्या या प्रवासाला साजिद जबाबदार आहे की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय बिपाशाने सगळी जबाबदारी स्वतःवर घेत सिनेमाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना नसण्याचे आणखी एक कारण सांगितले. तिने अजून एका ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "ही गोष्ट मी प्रसिद्धी कार्यक्रमांत भाग घेत नसण्यावरून उठणार्‍या सगळ्या अफवांना पूर्णविराम देईल. कोणत्याही सिनेमाचा भाग असणं किंवा नसणं विश्वासावर अवलंबुन असतं, परंतू माझ्या भूमिकेचं डबिंग झाल्यानंतर, त्याच्या अंतिम निकालामुळे मी अस्वस्थ झाली आहे. अशा परिस्थितीत मी सिनेमाच्या प्रसिद्धीत कसा भाग घेऊ मला समजत नाहीये. मी प्रामाणिकपणे सांगते की यामुळेच मी सिनेमाच्या प्रसिद्धीपासून दूर आहे."
आता बिपाशा आणि साजिद यांच्यात काय शिजतंय हे लवकरच कळेल, परंतू बिपाशाला असा विश्वास आहे की एक मोठा हिट सिनेमा ठरेल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा 'हमशकल्स'मधील काही निवडक फोटोज :