आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हमशकल्स’च्या प्रचारातून बिपाशा बसूला डावलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साजिद खानच्या सिनेमाच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. बिपाशाला मात्र याच्या प्रचारापासून दूर ठेवल्याचे दिसते. सिनेमात काही अन्य अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यामध्ये तमन्ना भाटिया आणि ईशा गुप्ताचा समावेश असून या दोघींपेक्षा बिपाशा सीनियर आहे.
‘हमशकल्स’चा प्रचार कण्यासाठी साजिदने एका रिअ‍ॅलिटी शोला हजेरी लावली. या वेळी त्याच्यासोबत तमन्ना आणि ईशाची उपस्थिती होती. बिपाशाला मात्र त्यांनी या शोसाठी बोलावणे उचित समजले नाही. या अपमानामुळे बिपाशा दु:खी झाली आहे. सूत्रांनुसार, साजिदच्या ‘हिम्मतवाला’ची नायिका तमन्ना भाटिया त्याची आवडती अभिनेत्री आहे. तसेच साजिद तमन्नाला आपली लहान बहीण मानतो.