आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhanush@31: वयाच्या 21 व्या वर्षी बोहल्यावर चढला होता धनुष, पाहा खासगी आयुष्याची झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धनुषची त्याच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे)

दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार धनुष आज (28 जुलै) आपला 31वा वाढदिवस आहे. 'रांझणा' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली कन्या ऐश्वर्याबरोबर झाला आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 18 नोव्हेंबर 2004 रोजी धनुष ऐश्वर्यासह लग्नगाठीत अडकला. तर वयाच्या 23 व्या वर्षी तो वडील झाला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म 2006 मध्ये तर दुस-या मुलाचा जन्म 2010मध्ये झाला. याथरा आणि लिंगा ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.

धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा आहे. वडील कस्तूरी राजा यांच्या 'आदुकलाम' (2011) या सिनेमात धनुषने काम केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले होते. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'कोलावरी डी...' या गाण्याद्वारे धनुष एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आला. या गाण्याला सी.एन.एनने 'टॉप साँग ऑफ 2011' म्हणून घोषित केले होते. याशिवाय वंडरबार फिल्म्स या होम प्रॉडक्शनची धुरासुद्धा धनुषने सांभाळली आहे. अलीकडेच धनुषने आपले म्युझिक लेबल 'वंडरबार स्टुडिओ'सुद्धा लाँच केले.
लवकरच धनुष अमिताभ बच्चन यांच्यासह 'शमिताभ' या आगामी सिनेमात झळकणार आहे. रांझणानंतरचा धनुषचा हा दुसरा हिंदी सिनेमा असेल.
आज धनुषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या लग्नाची आणि खागसी आयुष्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा धनुषचे खासगी आयुष्य...