आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Girl Anushka Sharma Looks Different Pics

B'day: बघा 6 वर्षांमध्ये किती बदलली 'रब ने बना दी जोडी'मधली तानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज आपला 26वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नाम सामील करणारी अनुष्काने बॉलिवूडमध्ये 'रब ने बना दी जोडी' या सिनेमामधून पाय ठेवला आहे. 2008मध्ये आपल्या करिअरला सुरूवात केल्यानंतर अनुष्काने खूप लवकर आपले स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले. 'बँड बाजा बारात' आणि 'जब तक है जान'सारख्या सिनेमांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांती प्रचंड प्रशंसा झाली.
अनुष्काने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती तेव्हा तिच्या लूकमध्ये खूप फरक होता. परंतु आता तिच्या सौंदर्यात वाढ झाली असून ती पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक दिसायला लागली आहे. त्यामुळे तिला कधी-कधी टिकांचासुध्दा सामना करावा लागत आहे. अनुष्काच्या ओठांच्या आणि गालांचा आकार बदलेला दिसत आहे. अनुष्का जेव्हा 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आली तेव्हा तिच्या ओठांचा आकार बदलेला दिसून आला आणि तेव्हापासून तिच्या लिप सर्जरी केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तिच्या या लूकची काहींनी प्रशंसा केली तर काहींनी टिकादेखील केली. परंतु अनुष्का म्हणते, तिने ओठांवर शस्त्रक्रिया केलेली नसून तिचा हा तात्पूरता लूक असून तो सिनेमासाठी केला आहे.
ओठांच्या शस्त्रक्रियेबाबत तिच्या प्रवक्त्याने सांगितले, तिने लिप प्लंपरचा (ओठांना आकार देण्यासाठी तात्पूरता वापरण्यात येणारा मेकअप) वापर केला आहे. तिने शस्त्रक्रिया केलेली नाहीये.
अनुष्का शर्मा 'बॉम्बे वेलवेट' सिनेमात रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अनुष्काचा बदलेला लूक आणि रेट्रो लूक...