आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतच प्रेमात पडला होता मनीष पॉल, करिअरची गाडी रुळावर आल्यावर थाटले लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता मनीष पॉल पत्नी संयुक्ता आणि मुलगी सेशासह)
छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणारा अभिनेता मनीष पॉलने रविवारी (3 ऑगस्ट) आपला 33वा वाढदिवस साजरा केला. मनीषला इंडस्ट्रीत आता वेगळ्या परिचयाची गरज उरलेली नाही. त्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत भरपूर यश मिळवले. सिनेमांसाठी मात्र त्याला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
मनीषचा जन्म 3 ऑगस्ट 1981 रोजी मुंबईत झाला, मात्र त्याचे बालपण दिल्लीत गेले. दिल्लीतील एपीजे स्कूल, शेख सराय येथून मनीषने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमधूनल व्होकेशनल स्टडीज कॉलेजमधून टुरिज्म या विषयात बीए पूर्ण केले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच मनीषने अँकरिंग सुरुं केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.
करिअरची सुरुवात..
मनीषला 2002मध्ये पहिल्यांदा 'संडे टेंगो' हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी मिळाली. त्यानंतर झी म्युझिक वाहिनीसाठी व्हीजे म्हणून त्याने काम केले. रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीवर मनीषने रेडिओ जॉकी म्हणून 'कसाकाए मुंबई' हा शो होस्ट केला. अशाप्रकारे त्याच्या करिअरला दिशा मिळत गेली.
अभिनय करिअरला सुरुवात...
स्टार वन वाहिनीवरील घोस्ट बना दोस्त या मालिकेत मनीषने घोस्टची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी', 'जिंदादिल', 'शssss फिर कोई है', 'व्हील घर घर में', 'कहानी शुरू विथ लव गुरू' या मालिकांमध्ये अभिनय केला.
मालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर तो अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'तीस मार खान' (2010) या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 2013 मध्ये मिक्की वायरस या सिनेमात तो लीड हीरो म्हणून झळकला. अभिनयासोबतच इव्हेंट होस्टिंगचे त्याचे काम सुरु आहे.
टीव्ही रिअॅलिटी शोजसह अनेक अवॉर्ड शोचे होस्टिंग त्याने केले आहे. सध्या झलक दिखला जा हा शो होस्ट करताना मनीष छोट्या पडद्यावर दिसतोय.
शाळेतील मैत्रीणीसह थाटले लग्न...
मनीषने 2007 मध्ये बंगाली तरुणी संयुक्तासह लग्न केले. संयुक्ता आणि मनीष एकाच शाळेत शिकत होते. 1998 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली होती. करिअरची गाडी रुळावर आल्यानंतर मनीषने संयुक्तसह लग्न थाटले. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव सेशा आहे.
मनीष पॉलची बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतची छायाचित्रे इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन आम्ही त्याची खास छायाचित्रे घेतली आहेत. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...