आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'किसना' फेम ईशा नृत्यात आहे पारंगत, पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डान्सने सर्वांना भूरळ घालणारी अभिनेत्री ईशा शरवाणीचा आज वाढदिवस आहे. 29 नोव्हेंबर 1984 रोजी ईशाचा जन्म गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये झाला. वयाच्या 13व्या वर्षी तिने आई आणि प्रसिध्द डान्स गुरु दक्षा सेठ यांच्याकडून डान्सचे प्रशिक्षण घेतले.
ईशाने फिल्मी करिअरची सुरुवात 2005मध्ये आलेल्या 'किसने' सिनेमातून केली होती. या सिनेमात तिने विवेक ओबेरायसोबत काम केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता. परंतु प्रेक्षकांमध्ये आणि ईशाच्या डान्सची खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर ईशा कॉमडी सिनेमा 'दरवाजा बंद रखो', जोया अख्तरचा पहिला सिनेमा 'लक बाय चान्स', अजय देवगणच्या प्रॉडक्शनचा 'यू मी और हम'सारख्या सिनेमांत तिने अभिनय केला आहे. आजही ईशा एका तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये करत आहे.
ईशाने 'झलक दिखला जा' या डान्स शोच्या पाचव्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या शोमध्येसुध्दा तिच्या डान्सची बरीच प्रशंसा झाली होती. परंतु जखमी झालेल्या ईशाला टॉप-3मध्ये पोहोचल्यानंतर शो सोडावा लागला होता. आतापर्यंत 7 सिनेमांमध्ये काम केलेल्या ईशाच्या पदरी यश पडलेले नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बर्थडे गर्ल ईशा शरवाणीच्या ग्लॅमरस अदा....