आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day : 28 वर्षांची झाली सनी देओलची बहीण अहाना, पाहा निवडक 21 Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[डावीकडून अहाना देओल, सनी आणि करण देओल (सनीचा मुलगा)]
मुंबई - बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लाडकी लेक अहाना देओल आज (28 जुलै) आपला 28वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जुलै 1985 रोजी मुंबईत अहानाचा जन्म झाला.
सनी आणि बॉबी देओल हे तिचे सावत्र भाऊ आहेत. जेव्हाही अहाना आणि तिची मोठी बहीण ईशा यांच्या आयुष्यात खास गोष्ट घडते, तेव्हा सनी आणि बॉबी यांच्या नावाची चर्चा ही हमखास होत असते. रक्षाबंधन या सणाला सनी आणि बॉबी ईशा-अहानाकडून राखी बांधून घेणार का? याकडेसुद्धा सर्वांच्या नजरा असतात. ईशाच्या लग्नावेळी सनी-बॉबी लग्नाला अनुपस्थित असल्याने ब-याच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर्षी अहानाचेही लग्न झाले. तेव्हादेखील हे दोन्ही भाऊ गैरहजर होते.
सनी आणि बॉबी हे दोघेही भाऊ आपल्या सावत्र बहिणींच्या लग्नात उपस्थित नव्हते. याशिवाय सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे बहीण-भाऊ कधी एकत्र आले नाहीत. मात्र इंटरनेटवर एक जुने छायाचित्र (वर) उपलब्ध असून त्यामध्ये सनी देओल त्याची सावत्र बहीण अहाना आणि मुलगा करणसह दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हेमा आणि धर्मेंद्र यांची लाडकी लेक अहानाची निवडक 20 छायाचित्रे...